देऊळगाव सिध्दी येथील घरकुल योजना घोटाळयाच्या चौकशीची मागणी
अहमदनगर/प्रतिनिधी
घरकुल योजना घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील परसराम अंबादास जगधने यांनी प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सन 2011-12, आणि 2017-18 या कालावधीतील घरकुलांची प्रकरणे बाहेर काढल्याने उपसरपंच बोरकर, सरपंच बुलाखे, पोलिस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना राग आल्याने माझे घरकुल होऊ दिले नाही, तसेच माझ्या आईची वारस नोंद होवू दिली नाही, आमच्या आईची सिटी सर्व्हेला वारस नोंद झालेली असून, सदर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील आम्हास मानसिक त्रास देत असून, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याची मक्रार या निवदेनाद्ारे करण्यात आली आहे.
सरपंच हे निवृत्त पोलिस अधिकारी असून त्यांनी विशेष घटक या शासकीय योजनेचा लाभ घेतल्याचे पुरावे आमच्या हाती आल्याचा राग आल्याने, माझ्या आईच्या जागेची नोंद होवू दिली नाही, माझे घरकुल होवू दिले नाही, खोटे गुन्हे दाखल करणे तसेच त्यांनी मला त्यांनी बेघर असल्याचा दाखला दिला आहे. पोलीस पाटील यांना तिसरा अपत्य असल्याची माहिती अधिकारामध्ये माहिती मागविल्याने सदर पोलिस पाटलांनी माझेवर खोटे गुन्हे दाखल केले.
तरी पोलीस अधिक्षकांकडे 4 मे 2018 रोजी त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार केली असता, सदर तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यावरून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर दि. 6 जून रोजी पोलिस अधीक्षकांकडे माझ्यावर 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दम देत आहेत. मी दिव्यांग असून, मला भाऊ, वडील नाहीत, सदर व्यक्तींमार्फत सातत्याने त्रास देणे सुरू असून, माझ्या अर्जाचा विचार केला जात नाही. समोरील व्यक्तीच्या अर्जाची सुनावणी त्वरीत केली जात आहे. तरी या प्रकरणाची फेरचौकशी आणि सदर व्यक्तीची आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई येत्या 15 दिवसांत करून, मला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मी आणि माझे कुंटूबीय मंत्रालयासमोर आत्मदहन करू, यांस पोलिस अधिक्षक आणि सदरील विभागच जबाबदार असेल असा इशाराही परसराम अंबादास जगधने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांतधिकारी, जिल्हाधिकारी, जि. प. अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.