Breaking News

शिक्षणाशिवाय जीवनाचा उद्धार नाही : आ. सुधीर तांबे


अहमदनगर । प्रतिनिधी। 
विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना शिक्षणाला सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय जीवनाचा उध्दार नाही. 10 वी, 12 वी नंतर करीअर करण्याच्या अनेक वाटा आहेत. त्या विद्यार्थ्यांनी शोधल्या पाहिजे. असे प्रतिपादन नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने 10 वी, 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बुधवारी मातोश्री मंगल कार्यालय, इंदोरी (ता. अकोले) येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. वैभव पिचड होते. यावेळी सिने अभिनेते नागेश भोसले, सिने अभिनेते सुधीर निकम यांचेसह राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, बीड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, खजिनदार एस. पी. देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेेचे सचिव प्रा. बी. एम. महाले, नगराध्यक्षा संगिता शेटे, जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सचिव मंगलदास भवारी, माजी पं. स. सभापती अंजना बोंबले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, अगस्तीचे संचालक मीनानाथ पांडे, सत्यनिकेतनचे सचिव टी. एन. कानवडे, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, गोरख मालुंजकर, कल्पना सुरपुरीया, सुलोचना वैद्य, नगरसेविका विमल भोईर, एस. पी. मालुंजकर आदींसह मोठया संख्येने मान्यवर उपस्थित होते.
वसंतराव मुंडे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षापासून गुणवंत गौरव सोहळा आयोजित केला जात आहे. त्याबद्दल अकोले तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले. मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावे. हे त्यांनी आत्ताच ठरविणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुढे यश प्राप्त होते. राजकारण, कलाकारण व अधिकारी होण्याची इच्छा या विषयांवर मुलांशी संवाद साधला. 
सुधीर निकम यांनी विद्यार्थी हे जीवनातील खरे हिरो आहेत. कुठलेही काम करा ते मनापासून करा, ज्या मातीतून पुढे आलात, त्या मातीला कधीही विसरु नका. आज 240 टिव्ही चॅनल कार्यरत आहेत. चित्रपट क्षेत्रात चांगल्या संधीची उपलब्धता आहे. त्याकडे मुलांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
नागेश भोसले यांनी ‘राम राम मंडळी’ या वाक्याने सर्वांशी संवाद सुरु केला. स्वतःची इच्छा असल्याशिवाय कुणीही अभ्यास करु शकत नाही. ‘पाटलाच नाद करायचा नाही, तर नाद करायचा तो फक्त पाटलाने’ या डायलॉगने प्रेक्षकांनी टाळया वाजून भरभरुन प्रतिसाद दिला. आई वडीलांनी आपल्या मुलांकडून जास्त अपेक्षा न ठेवता, त्याच्या आवडीनुसार शिक्षण द्यावे. मोठे होण्याची स्वप्ने जरुर पाहिली पाहिजे. पण त्याला कर्तृत्वाची जोड देणे गरजेचे आहे. 
अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना आ. वैभव पिचड यांनी मुलांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतले. त्या शाळेचे शिक्षक, गुरुवर्य, आई, वडील यांना कधीही विसरु नका असे आवाहन केले. अकोले तालुका हा आदिवासी तालुका असून गुणवत्तेमध्ये आम्ही कुठेही मागे नाही, हे पण सत्य आहे. यश मिळवायचे असेल तर पुर्व तयारी आवश्यक असते, यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणार्‍या सर्व ज्ञात, अज्ञातांचे करावे तेवढे कौतूक थोडे आहे. जीवनामध्ये मोठे व्हा, कष्ट करा, नाव कमवा असा विद्यार्थ्यांना गुरुमंत्र दिला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांच्या कार्याचा गौरव केला. 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनय व नाटय सम्राट पुरस्कार सिनेअभिनेते नागेश भोसले यांना व सिनेअभिनेते सुधीर निकम यांना देवून गौरविण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक आबाजी धुमाळ, अनिल रहाणे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, दप्तर, पाटी, पाणी बॉटल, कंपास, डबा तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सूर्यभान सहाणे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, कार्याध्यक्ष हेमंत आवारी, सचिव विद्याचंद्र सातपुते, दत्ता जाधव, प्रविण धुमाळ, संतोष साळवे, सहसचिव अण्णासाहेब चौधरी, उपाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, अशोक उगले, नितीन शहा, हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, निलेश वाकचौरे, सुनील आरोटे, राम भांगरे, सचिन खरात, राजू राठोड, निखिल भांगरे, अविष्कार सुरसे, ज्ञानेश्‍वर अवचिते, संतोष अवचिते, निलेश भागडे, गणेश रेवगडे आदिंनी परिश्रम घेतले. स्वागतगीत धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीअम स्कूल वीरगावच्या विद्यार्थींनींनी केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी केले. तसेच डी. के. वैद्य, रोटरीचे अध्यक्ष अमोल वैद्य, भाऊसाहेब चासकर, अल्ताफ शेख, प्रकाश महाले, बाळा पवार, जलसंपदाचे उपअभियंता रामनाथ आरोटे, अ‍ॅड. आनंद नवले, परिघा आरोटे, सुभाष खरबस, राजेंद्र उर्किडे, संजय उर्किडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन दत्ता जाधव यांनी केले तर आभार निलेश वाकचौरे यांनी मानले.