पेडगाव येथे जूगार अडड्यावर छापा; तब्बल 25 हजारांचा मुद्देमाल जप्त
श्रीगोंदा / प्रतिनिधी
तालुक्यातील पेडगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 25 हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार खेळणार्या व खेळवणार्या अठरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत माहिती अशी की, कालरोजी श्रीगोंदा पो. निरीक्षक बाजीराव पोवार यांना गुप्तबातमीदारामार्फत तालुक्यातील पेडगाव गावात शंभूराजे हेल्थ क्लबचे बाजूला असलेले काटवनात काही ईसम तिरट नावाचा हारजितीचा जूगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती समजली, त्यानुसार पो.नि. पोवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील पो. ना. शिरसाठ, पो. कॉ. प्रकाश वाघ, संभाजी वाबळे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, किरण भापकर,भारत खारतोडे, गांगर्डे, केशव व्हरकटे यांना बोलावून सदर ठिकाणी छापा टाकण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सदर पोलीस पथकाने पेडगाव येथे जावून सदर जूगार सुरू असलेल्या ठिकाणी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता, सदरचे ठिकाणी दोन वेगवेगळे डावात गोलाकार काही इसम बसलेले होते. ते पोलिसांना पाहून हातातील पत्ते खाली टाकून पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी जागीच पकडून त्यांचेकडून 25,010 रुपये रोख व जूगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून अठरा जनांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा जूगार अड्याचा मालक हा देविदास शिर्के रा. पेडगाव येथील असल्याचे सांगितले. तसेच जूगार खेळणारे गणपत शिर्के, बलभीम खेडकर, योगेश शेळके, अशोक झिटे, साहेबराव गावडे, प्रकाश खळदकर, ज्ञानदेव खेडकर, नवनाथ मुळे, बशीर तांडेल, दिलीप दिवटे, भाऊसाहेब खेडकर, पोपट झिटे, रतन झेंडे, मच्छिंद्र गोधडे, उमर तांडेल, संदीप काळे, किसन गोधडे, बबन दिवटे सर्व रा. पेडगाव, या अठरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जूगार अड्डा मालक देविदास शिर्के हे फरार आहेत. पो. कॉ. उत्तम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्व जणांविरोधात महा जूगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
