राष्ट्रीय कुराश स्पर्धेत अभिनवच्या ज्योती भांगरे हिस रौप्यपदक
अकोले / ता. प्रतिनिधी
नुकत्याच झारखंड राज्यातील धनबाद येथे झालेल्या तिसर्या सब ज्युनिअर राष्ट्रीय कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमधील 8 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये ज्योती पांडुरंग भांगरे (इ.8 वी) हिला रौप्य पदक मिळाले. तर मधुरा रवळू बेळगावकर (इ.10 वी), संजना संजय देशमुख (इ.10 वी), सोनाली मारुती खोकले (इ. 10 वी), दिपाली चिंधू मुठे (इ. 10 वी), प्रज्ञा माधव वाकचौरे (इ.10 वी), अर्चना अंकुश पारधी (इ. 10 वी), ओम आत्माराम शेटे (इ. 8 वी) यांनी देखील आपला सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली. या संघास निलेश गुंजाळ यांचे कोच म्हणून मार्गदर्शन लाभले. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, उपाध्यक्ष सुरेश कोते, सचिव रमेशचंद्र खांडगे, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, क्रीडा शिक्षक आदिनाथ आभाळे, ऋषिकेश वालझाडे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
