अधिकृत वाळुउपशास विरोध करणार्या 22 महिलांवर गुन्हा
अधिकृतरीत्या आघी येथील लिलाव झालेल्या वाळू उपशाला दिघी येथील महिलांनी विरोध करत सीना नदीपात्रातील वाळु उपसा अडवला. तसेच वाळूच्या ट्रॅक्टरला आडवे उभे राहून शिवीगाळ करून, ट्रॅक्टर पेटवून देऊ अशी धमकी दिली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एकुण 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनाकडून मिळालेली माहिती अशी फिर्यादी कर्नल चंद्रकांत भांबरे वय 31 रा. चंदननगर खराडी, चौधरीवस्ती, पुणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुणे येथील चंदननगर येथे राहणारेे संतोष संपत जगताप यांनी आघी ता. जामखेड येथील सीना नदीपात्रातील गौण खनिज वाळुचा शासनाचा लिलावाप्रमाणे वाळु उपसा घेतला आहे. त्याचे व्यवस्थापक म्हणून फिर्यादी भांबरे हे काम पहात आहेत. विशेष म्हणजे या वाळु उपशास पोलीस बंदोबस्त घेतला आहे. दि. 8 जुन रोजी सकाळी अकरा वा. सीना नदीपात्रातून आघी गावच्या शिवारात वाळु उपसा करुन, ट्रॅक्टरद्वारे घेऊन, जात असताना कर्जत तालुक्यातील दिघी येथील महिला शोभा मंडलिक, वनिता निंबाळकर, प्रियांका भोईटे, रुपाली महारनवर, संगिता निंबाळकर, सुनंदा निंबाळकर, शोभा महारनवर, सुनिता निंबाळकर, हौसाबाई थोरात, गंगुबाई निंबाळकर, हिराबाई भोईटे, सुमन भोईटे, आहील्या निंबाळकर, सविता निंबाळकर, सुमन निंबाळकर, प्रयाग निंबाळकर, अर्चना निंबाळकर, शकुंतला निंबाळकर, केराबाई शेवाळे, साखरबाई भोईटे, सुमन महारनवर, लता निंबाळकर, अशा एकुण बावीस महिलांनी एकत्र जमा होऊन ट्रॅक्टरला रस्त्यात आडवे उभे राहून ट्रॅक्टरची हवा सोडून दिली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून, वाळुउपसा करण्यास विरोध केला. येथे वाळू भरण्यास आल्यावर ट्रॅक्टर पेटवून देऊ अशी धमकी दिली.
आघी येथे वाळू उपसा करण्यासाठी गेलेल्या वाहणावर दि. 22 मे रोजी देखील संतप्त दिघी येथील ग्रामस्थांनी हल्ला करून वाहणांची मोडतोड करून चालकास मारहाण केली. या प्रकरणी दहा ते बारा ग्रामस्थांनवर जामखेड पोलिस स्टेशनला दहा ते बारा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आमच्या दिघी भागातील सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थांनी त्याचवेळी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले होते. या घटनेनंतर अधिकृत असलेल्या वाळु उपशाला आघी येथे पोलिस बंदोबस्त देखील ठेवला होता. तरी देखील दिघी येथील ग्रामस्थ विरोध करत असल्याने हा वादाचा विषय ठरत आहे.