Breaking News

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणार्‍यास मृत्यूदंड

चंडीगढ : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठविण्याच्या निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री अमरिदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर अल्पवयीन बालिकांवरील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने बालकांचे लैंगिक शोषणापासून सुरक्षा (पोक्सो) कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. 12 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणार्‍या दोषींना फाशीची शिक्षेची तरतूद केली होती.