‘शिक्षक’मध्ये कपिल पाटील तर ‘पदवीधर’मध्ये शिवसेनेचे पोतनीस विजयी
नवी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकालासाठी मतमोजणी बुधवारी पार पडली असून, मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकतांत्रिक जनता दल (लोकभारती) चे उमेदवार कपिल पाटील यांनी विजय खेचून आणला आहे. पहिल्या फेरीत 4 हजार 500 मतांनी कपिल पाटील यांनी विजयी आघाडी घेतली होती. दुसरीकडे मुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी पहिल्या फेरीत 20 हजार मतांपैकी 11 हजार मते विजयी घौडदौड करत आपला विजय संपादन केला. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरू आहे. नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली होती.
कोकण पदवीधरमधील मतदारांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी मतमोजणी सुस्थितीत व वेगाने होण्यासाठी 28 टेबल्स मांडण्यात आले आहेत. 78 सदस्यीय विधान परिषदेत सात मतदारसंघ हे पदवीधर तर सात मतदारसंघ हे शिक्षकांसाठी राखीव असतात. एकूण 14 आमदार हे पदवीधर व शिक्षकांमधून निवडून येतात. 30 आमदार हे विधानसभेतून निवडले जात असून, इतर 22 सदस्य हे स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात. मुंबई शिक्षक मतदारसंघात 8 हजार 353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.12 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37 हजार 237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75 हजार 439 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 72.35 आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात 49 हजार 742 एवढे मतदान झाले असून, त्याची 92.30 टक्केवारी आहे.