Breaking News

समाविष्ट 11 गावांचा डिपी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

पुणे, दि. 03, जून - पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश केलेल्या 11 गावामध्ये मोठयाप्रमाणात अनाधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे या गावाचा डिपी तयार करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली. लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, पुरसुंगी, उरुळी देवाची या गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेला आहे. या समाविष्ट गावांमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, बांधकामांमध्ये अनियमितता आहे. कचरा, पाणी, रस्ते यांचा नियोजनबद्ध विकास होत नाही, महापालिकेला अपेक्षित महसुली उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या गावांचा विकास  आराखडा होणे आवश्यक आहे. त्यामुळे या डिपी बाबत लवकरात लवकर या संदर्भातील अधिकारी नेमून इरादा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करावी. डिपी संदर्भात कार्यवाहीला चालना द्यावी व या संदर्भात शहर सुधारणा समितीचे सर्व सभासद व अधिकारी यांचे समवेत एकत्र बैठक घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.