Breaking News

अनिकेत तटकरे यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ


मुंबई, दि. 03, जून - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक प्रधिकरण संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांनी आज विधान भवनात विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, आमदार सर्वश्री सुनील तटकरे, हेमंत टकले, जयंत पाटील, नवाब मलिक आदी उपस्थित होते.