Breaking News

31 मेपर्यंत सुमारे 142 कोटीची विक्रमी वसुली !

ठाणे, दि. 03, जून - सन 2018-19 या आर्थिक वर्षात जे करदाते त्यांच्या मालमत्तेचा संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर थकबाकीसह 31 मे पूर्वी महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना दुसर्‍या सहामाहिच्या सामान्य करावर ( अग्निशमन कर वगळता ) 10 टक्के सूट देण्याच्या एरीश्रू इळीव खपलशपींर्ळींश डलहशाश योजनेस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेस 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून या योजनेचा सर्व करदात्यांनी जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
करदात्यांनी या योजनेस दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे 31 मेपर्यंत मालमत्ता कराची सुमारे रुपये 142 कोटीची विक्रमी करवसुली झालेली असून सदर वसुली मागील 31 मे, 2017 रोजीच्या वसुलीपेक्षा सुमारे रुपये 12 कोटीने जास्त वसुली झालेली आहे. प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावर करदात्यांची कर भरण्याकरिता गर्दी होत आहे. तसेच सदर मुदत वाढविणेबाबत करदात्यांनी केंद्रावर विनंती केल्याने व 10 टक्क्यांची सवलत वाढविल्यास आणखी चांगली करवसुली वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीतच होऊ शकेल हे विचारात घेवून 10 टक्के सूटची मुदत 15 जूनपर्यंत वाढ विण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
मालमत्ता कर ुुु.ींहरपशलळीूं.र्सेीं.ळप या महापालिकेच्या संकेत स्थळावर इ सुविधा कॉलममध्ये ‘मालमत्ता कर ’ यावरुन किंवा याच कॉलममधील ‘ माय पिटॅक्स ’ ( झीेशिीीूं ढरु ेी चू झढरु ङळपज्ञ र्ीपवशी श डर्शीींळलशी ) या लिंकवरुन तसेच ाूिींरु.ींहरपशलळीूं.र्सेीं.ळप या लिंकवर जावून ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. तरी करदात्यांनी या योजनेचा जास्तीत लाभ घ्यावा.