Breaking News

उपक्रमशील शिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी प्राध्यापक प्रशिक्षण

पुणे, दि. 18, मे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व विद्यापीठ स्तरावर उपक्रमशील शिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी प्राध्यापक प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात टीचर्स लर्निंग सेंटर सुरू झाले आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ संलग्न महाविद्यालये आणि राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये देशभरातूनही प्राध्यापक सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या टीचर्स लर्निंग विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवताना प्रयोगशीलतेवर भर द्यावा यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमातील दोन दिवसीय कार्यशाळा वनस्प तिशास्त्र विभागाच्या वतीने नुकतीच पार पडली.