Breaking News

नाशिक सायकलीस्ट : महिला दिनानिमित्त ‘ट्रेजर हंट’चे आयोजन

नाशिक, दि. 08 मार्च - नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि हॉटेल एसएसके सॉलेटीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बीब्राईट बीबोल्ड बीफॅॅब्युलस म्हणजेच ‘धाडसी बना, आनंदी राहा, उत्कृष्ट बना’ असा नारा देत येत्या 10 मार्चला सकाळी 7 वाजता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी महिलांसाठी ‘ट्रेजर हंट’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक सायकलीस्टतर्फे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या महिला सायकल रॅलीचे नियोजन सायकलीस्टच्या महिला सदस्यांनी केले आहे.
विशेष असे ट्रेजर हंट यावेळी घेण्यात येणार असून महिलांच्या शोधक वृत्तीला यातून चालना मिळणार आहे. हे ट्रेजर हंट हॉटेल एसएसके सॉलेटीर तिडके कॉलनी येथून सुरु होऊन 10 किमीचा फेरा करून पुन्हा येथेच समाप्त होईल. ट्रेजर हंट मध्ये नाशिक शहरातील महत्वाचे ठिकाणी जाऊन पुरावे शोधत तेथून एक वस्तू घेऊन तेथे असलेल्या पुराव्या नुसार पुढच्या ठिकाणी पोहचणे जरुरीचे असते. अशा पद्धतीने शोध घेत संघाला एसएसके सॉलेटीर येथे पोहचणे आवश्यक आहे.