Breaking News

पारंपरिक शेती पद्धतीला कृषी पर्यटनाची जोड आवश्यक - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर


मुंबई, दि. 17 : ग्रामीण भागातील पारंपरिक शेतीला कृषी पर्यटनाची जोड मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषी पद्धती जपून कृषी पर्यटनाला वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे संयोजक पांडुरंग तावरे आदी यावेळी उपस्थित होते.