चिमुरडयाने दिली ‘पर्ननवा’ ची दुर्मिळ माहिती
राहुरी : ‘पुनर्नवा’ या वनस्पतीकडे केवळ जनावरांचा चारा म्हणून ग्रामीण भागात पाहिले जाते. मात्र येथील कृष्णा गोविंद आहेर या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्याने ‘पुर्ननवा’ या वनस्पतीबद्दल शास्त्रीय आणि दुर्मिळ माहिती देऊन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला़.
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत मातृभूमी व्यसन निमुर्लन संस्थेच्या माध्यमातून मोफत योग-प्राणायमचे नियमित वर्ग सुरू आहे़त. या वर्गासाठी आलेल्या कृष्णा आहेर या लोणी येथील विद्यार्थ्याने ‘पुर्ननवा’ या वनस्पतीबद्दल माहिती सांगण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली़. त्यानुसार संयोजकांनी प्राणायम वर्गात कृष्णाला ही संधी उपलब्ध करून देण्यात आली़.
त्यानुसार आहेर याने सांगितले, ‘पुर्ननवा’ ही वनस्पती उन्हाळयात कमी प्रमाणावर उपलब्ध होत असली तरी पावसाळयात मोठया प्रमाणावर उपलब्ध होते़. उन्हाळयात पाने किंवा काड्यांपासून पाणी मिळाल्यानंतर पुन्हा जिवित होते. म्हणून तिला ‘पुर्ननवा’ असे नाव ऋषींमुनींनी दिले. ‘पर्ननवा’ ही वनस्पतीपासून भाजी आरोग्यदायी आहे़. किडणीचे विकार, शरिरावरील सूज, गाठी, काविळ, रक्तवाढ यावर ही वनस्पती उपयुक्त असल्याचे कृष्णा आहेर याने सांगितले़.
चारा नव्हे बहुउपयोगी ‘पुर्ननवा’
पुर्ननवा या वनस्पतीमुळे वृध्द व्यक्तीमध्ये सुध्दा तरुणांसारखा उत्साह निर्माण होतो़. आजारी, निरोगी, लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी ही वनस्पती महत्वाची आहे़. पर्ननवापासून थालीपीट बनविता येते़. मेथीसारखी कोरडी अथवा करडईसारखी हटवून पुर्ननवाची भाजी बनविता येते़. या वनस्पतीकडे जनावरांचा चारा म्हणून न पहाता रस्त्याच्या कडेला अथवा शेतामध्ये आढळणा-या पुर्ननवा या वनस्पतीचा पावसाळयात मोठया प्रमाणावर आस्वाद घ्यावा़.
कृष्णा आहेर, विद्यार्थी.
