Breaking News

उमरखेड ‘कृउबास’ निवडणुकीकरीता गणांची यादी सुचना फलकावर जाहीर


मुंबई, दि. 27, मे - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या प्रयोजनार्थ जिल्हाधिकार्‍यांना ‘कृउबास’ जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तयार करावयाच्या मतदार याद्यांचे अधिक्षण, संचलन व नियंत्रण करण्याकरीता सदर गावातील गावनिहाय खातेदारांची संख्या विचारात घेऊन याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर गावांचे एकूण 15 गणांमध्ये विभाजन केलेल्या 1 फेब्रुवारी 2017 रोजी मुदत संपलेल्या उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार स मितीच्या गणांची यादी संबंधित बाजार समिती, संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांच्या कार्यालयीन सुचना फलकावर लावण्यात आली आहे. यात मुळावा येथे 4763 मतदार संख्या, पोफाळी 4495, बेलखेड 4782, उमरखेड 2746, सुकळी (ज) 3384, मार्लेगाव 3585, विडूळ 4399, देवसरी 5479, चातारी5822, ढाकणी 5122, बिटरगाव 5741, कुरळी 2776, निगणूर 5365, भवाणी 3343 आणि खरबी येथे मतदार संख्या 4398 अशी एकूण 66 हजार 200 मतदार संख्या आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचे गणामध्ये विभाजन करतांना प्रत्येक गणात साधारणत: समान खातेदार संख्या विभागण्यात येऊन यासह सलग्न करण्यात आलेल्या प्रारुप गणावर 5 जून रोजी सायंक ाळी 5 वाजेपर्यंत आक्षेप उमरखेड उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात दाखल करावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.