Breaking News

दावल मलिक बाबांचा आजपासून उरूस

राहुरी : देवळाली प्रवरा येथील पटेल वस्ती येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही आजपासून {दि. ५} दावल मालिक बाबा यांच्या उरुसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वा चादर अर्पण करण्यात येणार आहे. रात्री ७ ते १० या वेळेत भंडारा व त्यानंतर कव्वालीचा सामना होणार आहे. सर्वधर्म समभाव या विचाराने येथे सर्वधर्मिय भाविक दरवर्षी हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. या दर्गाचे व्यवस्थापक अकिल बाबा पटेल व त्यांचे कुटुंब आहेत. सर्व जातीधर्मातील लोक मिळून या ठिकाणी मोठ्या जबाबदारीने येणाऱ्या भाविकांची सेवा करतात. उरूस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील खादीम वर्गातील सदस्य मुरलीधर तांबे, बाळासाहेब जोशी, शरद टेकावडे, अप्पासाहेब शेटे, सतीश क्षीसागर, गणेश भांड मित्र मंडळ, सत्यजित कदम मित्र मंडळ, रामरहिम एकता मंडळ, सुलतान ए हिंद तरुण मित्र मंडळ, इनामदार वस्ती तरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असते. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हजरत अकिल बाबा व दर्गा व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.