राहुल गांधी यांनी दिले पंतप्रधान मोदींना चॅलेंज
नवी दिल्ली : सध्या देशभरात फिट इंडिया मोहिमेची धूम सुरू असताना, या मोहिमेला आता राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीनं दिलेलं फिटनेसचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले. हाच धागा पकडून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी करण्याचे आव्हान दिले आहे. मोदीजी तुम्ही विराटचे फिटनेस चॅलेंज स्विकारले याचा आनंद आहे, आता माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कमी करा. किंमती कमी झाल्या नाहीत तर आम्ही देशभर निदर्शनं करू आणि किंमती कमी करायला तुम्हाला भाग पाडू असा इशाराही राहुल गांधींनी पंतप्रधानांना दिले.
