निपाह साथीचा रोग नाही : केंद्र सरकार
नवी दिल्ली : दुर्मिळ निपाह वायरस (एनआयव्ही) हा साथीचा रोग नसल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी गुरुवारी सांगितले. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे, आमच्या डॉक्टरांची टीम घटनास्थळी उपस्थित आहे. हा साथीचा रोग नाही. सर्व प्रकारची सावधगिरी बाळगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे चौबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. निपाह वायरसमुळे केरळमध्ये आत्तापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. नागरिकांनी कोझीकोड, मलप्पुरम, वायनाड आणि कन्नूर येथे जाताना विशेष काळजी घ्यावी, असे केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.
