Breaking News

पुणे रेल्वे स्टेशनवरून मुलीचे अपहरण

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये एक अज्ञात महिला मुलीला घेऊन गेल्याचे उघड झाले. जयश्री चव्हाण असे या अपहरण झालेल्या मुलीचे नाव आहे. उषा आणि जयसिंग चव्हाण हे नागपूरवरून रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. स्टेशन बाहेरील दर्ग्याजवळ हे कुटुंब थांबले होते. त्यावेळी जयश्री आणि तिचा भाऊ परिसरात खेळत होते. त्यावेळी या मुलीचे अपहरण करण्यात आले. 21 तारखेला ही घटना घडली. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणावरून एका लहान मुलीचे अपहरण झाले होते. त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.