Breaking News

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. उद्या (मंगळवारी) दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईच्या 12 वीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इयत्ता 10 वीच्या परीक्षेला देशभरातून 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. निकालासाठी भेट द्या : ललीशीर्शीीश्रीीं.पळल.ळप, ललीश.पळल.ळप रपव ीर्शीीश्रीीं.पळल.ळप. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.