Breaking News

अच्छेदिन वाले सरकारचे 4 वर्षातील कामे आनलाईन शिष्टाचार भाग 2 हरिभाऊ सोनवणे, नाशिक

मोदी सरकारच्या कारकीर्द चे चार वर्षे भरले आहेत. या चार वर्षात सरकारने कुठले कल्याण कारी कामे केली याचा आढावा सर्वसामान्य नागरिक सोशल मीडिया वर घेत आहेत. नागरिकांनी घेतलेला आढावा त्यांचाच शब्दात. आधार कार्ड बनवा.
आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
नोट बदलून घ्या.
बदलेल्या नोटांचा हिशोब दया.गैस सब्सिडी सरेंडर करा.एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.सामान(ॠेेवी) वर टॅक्स भरा
सर्विस वर टॅक्स भरा
कफन वर टैक्स भरा.
सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकतात.शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. पेट्रोल/डिझेल सह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी. कुठेही क ाहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात.आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण के ला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले. भारतात 800 रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी 86 हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.*
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
69 लाख रुपये पेमेंट साठी 63 गरीब बालकांचा बळी गेला.
75 खासदार व 337 आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
*आता तुम्हीच सांगा यांचे स्वच्छ भारत अभियानभारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?*
अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का? अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिक आता सोशल मीडिया वर पोस्ट टाकून मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजाचा हिशेब मांडत आहेत.