‘ग्रीन सिटी’ संकल्पना अंमलात आणा - सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 06, मे - स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर ग्रीन सिटी संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.राज्यात जुलै महिन्यात होणार्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम व्यावसायिकांची बैठक आयो जित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
हरित शहरांच्या निर्मितीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी योगदान द्यावे, गृहनिर्माण सोसायट्यांची कामे करताना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन हा विषय कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न अडकवता अधिकाधिक लोकांना हे काम स्वत:च्या जीवनासाठी महत्वाचे वाटले पाहिजे, हा वन सत्याग्रह आपला आणि राज्याच्या अभिमानाचा विषय वाटला पाहिजे, अशी भावना आपण निर्माण करत आहोत. म्हणूनच राज्यात महावृक्ष लागवड हा केवळ शासनाचा उपक्रम राहिला नाही, ती आता लोकचळवळ झाली आहे. पहिल्यावर्षी एक ाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प 2 कोटी 81 लाख रोपं लावून पूर्णत्वाला गेला तर दुसर्या वर्षीच्या 4 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची 5 कोटी 43 लाख रोपं लावून पूर्तता झाली. लोक ांनी वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. या दोन्ही वर्षांच्या वृक्ष लागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.