महापालिका आयुक्तांची मासिक आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. 06, मे - महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक भायखळा प रिसरातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणीचा बाग) पेंग्वीन इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
आजच्या बैठकी दरम्यान चर्चिले गेलेले प्रमुख मुद्दे व संबंधित आदेश याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहेत:
धोकादायक परिस्थितीतील झाडांबाबत वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात एकूण 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर 11 लाख 25 हजार 182 एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त 1 लाख 85 हजार 333 झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित 1 लाख 1 हजार 67 एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.खाजगी / शासकीय / निमशासकीय परिसरातील झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे.