Breaking News

वंचित घटकांसाठी समाजानेही योगदान द्यावे - प्राजक्ता माळी

पुणे, दि. 06, मे - ज्यांची काहीच चुकी नाही ; पण माता - पित्यांमुळे जीवघेण्या एड्स आजाराला बळी पडलेत ,कधीपर्यंत ते जगतील हे माहित नाही. अशा मुलांसाठी एखादी संस्था , व्यक्ती क ार्य करीत आहे ही बाब खूप मोलाची आहे उलट त्यांच्या कार्याला समाजानेही हातभार लावला पाहिजे ,वंचित घटकांसाठीही योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी हिने व्यक्त केली. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवाराने गुजर निबाळकर वाडी येथील ममता फौंडेशनमधील एड्सग्रस्त मुला -मुलींसाठी मनसोक्त आंबे खा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्राजक्ता माळीही सहभागी झाल्या होत्या.त्यावेळी त्या बोलत होत्या. माळी म्हणाल्या ,समाजापासून वंचित असलेल्या या मुलांसाठी कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही शिल्पा बुडुख , या काम करीत आहेत आणि या मुलांच्या चेहर्‍यावर आनंद यावा, त्यांचे शेवटचे जीवन सुसह्य व्हावे , ते आनंदाने जगावे यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल , अमित बागुल आणि मित्रपरिवार सातत्याने विविध कार्यक्रम या मुलांबरोबर घेतात हे खूप महत्वाचे आहे आणि समाजानेही या वंचित मुलांसाठी योगदान द्यावे असेही माळी यांनी स्पष्ट केले. या वंचित मुलांसाठी दिवाळी पहाट , दिवाळी संध्या , नववर्ष स्वागत ,विविध सणवार वर्षभर अमित बागुल मित्रपरिवारा कडून साजरे केले जातात, गेले दहा वर्षे हे उपक्रम सुरु आहेत. विशेष म्हणजे या मुलांच्या हवाई सफरची इच्छा अमित बागुल यांच्या वाढिदवसानिमित्त दोनवेळा पूर्ण करण्यात आलेली आहे.या शिल्पा बुडुख यांनी दिलेल्या मा हितीवर प्राजक्ता माळी यांनी यापुढे माझ्यापरीनेही या उपक्रमात सहभाग असेल अशी ग्वाही दिली.