Breaking News

मुंगशीच्या सरपंचपदी रेश्मा थोरात

सुपा / प्रतिनिधी । रनेर तालुक्यातील मुंगशीच्या सरपंचपदी रेश्मा थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तत्कालीन सरपंच मनिषा थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुमारे दोन वर्ष सरपंचपद रिक्त होते. शासकिय प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक अधिकारी म्हणून वाडेगव्हाण मंडलाधिकारी दत्ता गंधाडे यांनी काम पाहिले, त्यांना ग्रामसेविका जपकर यांनी सहाय्य केले. रेश्मा थोरात यांच्या नावाची सूचना अनिल करपे यांनी मांडली, त्यास सर्व सदस्यांनी हात वर करुन मतदान केले. यावेळी उपसरपंच अनिल करपे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता थोरात, गीता करपे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच थोरात म्हणाल्या की, गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार असून, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्‍वासात घेवून विविध विकासकामे केली जातील, तसेच गोरगरिब, गरजूंना तसेच महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे, सरपंच थोरात यांनी सांगितले. या निवडीचे ग्रामस्थांनी गुलाल उधळत व फटाके वाजवून स्वागत केले.
यावेळी संजय थोरात, सुदाम थोरात, दादा करपे, सतिष थोरात, वामन थोरात, भास्कर थोरात, सुदाम दळवी, बबन थोरात, छगन थोरात, बाळू थोरात, गिता करपे, सुनिता थोरात, मच्छिंद्र थोरात, दादा थोरात, पांडुरंग शिंगोटे, सचिन थोरात, राजेंद्र थोरात, अशोक थोरात, मोहन साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.