हिरडगाव सरपंचपदी मनिषा शिंदे
श्रीगोंदा / प्रतिनिधी - हिरडगाव ग्रापंचायतीत ठरल्यानुसार सरपंच पदासहउपसरपंच निवड शांततेत पार पडली. विरोधकांसह सर्व सदस्यांनी मनिषा बाळासाहेब शिंदे यांना पाठिंबा दिला. निवडणूक निर्णय अधिकारी विलास आजबे यांनी मनिषा शिंदे सरपंच झालेचे घोषीत केले. उपसरपंच म्हणून सुनिता दरेकर यांची निवड करण्यात आली. सहाय्यक अधिकारी ग्रामसेवक कांतीलाल माळशिकारे, तलाठी श्रीपाद विठ्ठल यांनी कामकाज पाहिले. यावेळी आभार व्यक्त करताना ज्येष्ठ नेते अंबादास दरेकर यांनी महिला राज आणून खांदे पालट वचन पूर्ती करत असताना हिरडगाव पंचायत हागणदारी मुक्त आणि दारु मुक्त करु अशी घोषणा केली. यावेळी मिंलीद दरेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रंशात दरेकर, ज्येष्ठ नेते रामभाऊ गुणवरे, पी.जे. दरेकर, गंगा दरेकर, चिमाजी दरेकर, शिक्षण अधिकारी के.आर ढवळे, अंकुश भोस, शांताराम भुजबळ, भाऊ काळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मदणे, बबन पोळ, केंद्र प्रमुख गजानन ढवळे, कल्याण दरेकर आदी उपस्थित होते.