कापडी पिशवी उद्योगासाठी संधी
सोलापूर, दि. 11, मे - राज्यशासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्याने कापडी पिशवी उद्योगासाठी चांगली संधी आहे. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कलात्मक क ापडी पिशव्या तयार करण्याचा उद्योग सुरू करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद तर्फे ग्रामस्वराज्य पंधरवड्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. नवाळे म्हणाले, प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरण संवर्धनाची चळवळ गतिमान होईल. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याची चळवळ वाढविण्यावर बचत गटांनी पुढाकार घ्यावा. घडी केल्यानंतर खिशामध्ये सहज बसणार्या व त्यामध्ये किमान दोन ते चार किलोपर्यंत साहित्य आणण्याची क्षमता असलेल्या पिशव्यांना सध्या चांगली मागणी आहे. कल्पकतेने पिशव्यांची निर्मिती करावी. याप्रसंगी श्री. नवाळे यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी, उत्कृष्ट प्रेरिका, यशस्वी उद्योजिका, निर्मल समूह व ग्रामसंघ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.