बीबीएच्या दोन विषयांची पुनर्परीक्षा घेण्यात येऊ नये - अभाविप
सोलापूर, दि. 11 , मे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोलापूर विद्यापीठाला निवेदन देऊन बीबीएच्या दोन विषयांची पुनर्परीक्षा घेण्यात येऊ नये असे निवेदन दिले होते. याप्रकरणी विद्यापीठाने पुनर्परीक्षेच्या तारखा घोषित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रवेश द्वारावर सकाळी 11 ते दुपारी 4 असे ठिय्या आंदोलन केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, डॉ. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बीबीए परीक्षेचा दोन विषयात सेट केलेला पेपर हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने सराव परीक्षेसाठी हिराचंद नेमचंदच्याच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला होता. नेमकी हीच प्रश्नपत्रिका विद्यापीठीय बीबीए परीक्षेसाठी आली. याची तक्रार संगमेश्वर महाविद्यालयाने विद्यापीठाकडे केली. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाने या विषयांच्या पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा 14 व 16 मे रोजी दुपारच्या सत्रात होतील. दरम्यान पुनर्परीक्षा घेऊ नये, पेपर फुटीची कल्पना विद्यार्थ्यांना नव्हती.
अभ्यास करून पेपर सोडविले गेले, अशी भूमिका मांडत अभाविपने पुनर्परीक्षेसाठी विरोध केला. दरम्यान 5 मे रोजी कुलसचिव व परिक्षा नियंत्रक यांची भेट घेऊन बी.बी.ए च्या आय.बी व ओ.बी या विषयाचे पुनः परीक्षा घेऊ नये यासाठी निवेदन दिले होते. त्यांना दोन दिवसांची मुदत देऊनही विद्यापीठ प्रशासनाने त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे अभाविप ने सर्व विद्यार्थ्यांना घेऊन विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सकाळी अकरा ते चार पर्यंत केले.
आंदोलनात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी बेस्ट ऑफ टू असा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.