मंत्रालय घोटाळा चौकशीसाठी तीन स्वतंत्र समिती नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय रणजीत हांडेंसह प्रज्ञा वाळकेंवरील दोषारोप सिध्द होण्याचे संकेत
मुंबई/विशेष प्रतिनिधी । 21 मंत्रालयातील डेब्रीज काँक्रीटीकरण घोटाळ्यापासून काल-परवाच्या उंदीर घोटाळ्यापर्यंत अपहाराची चौकशी टाळण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर चौकशी अहवालात आरोपांची तीव्रता कमी दृष्टीकोनातून रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी सापळा लावण्याचा खटाटोप सुरू केल्याचे वृत्त आहे. तथापी या घोटाळ्याची तीव्रता लक्षात घेता या पातळीवर या संशयीत कार्यकारी अभियंत्यांना यश येण्याची शक्यता धुसर मानली जात आहे. हे प्रकरण केवळ भ्रष्टाचारापुरते मर्यादीत राहीले नसून सरकारच्या प्रतिष्ठेशी खेळणे, या कार्यकारी अभियंत्यांना महागात पडण्याची शक्यता साबांतून व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय इमारतीत डेब्रीज, काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, शेकडो मजूरांचा वावर, उंदीर मारण्याची प्रक्रिया या सोबत मनोरा आमदार निवास कक्ष दुरूस्ती आदी विविध प्रकरणांत झालेल्या घोटाळ्याने महायुती सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. राज्याचा कारभार हातात घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याचे वचन जनतेला दिले होते. मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या या वचनाला राज्याच्या मुख्यालयातच हरताळ फासण्याचे पाप मुंबई शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी केल्याने अवघ्या सरकारची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. ही वस्तुस्थिती निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना दिले आहेत. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी गेल्या वर्षभरात या संदर्भात सात तक्रारी केल्यामुळे या घोटाळ्याची तीव्रता भयानक असल्याचे मुख्यमंत्र्यांसह साबां मंत्र्यांच्या लक्षात आली आणि महाराष्ट्राच्या इ तिहासात प्रथमच एखाद्या विभागाने एका ठिकाणी केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची वेगळी समिती नियुक्त करण्याची घटना घडली. यावरून महाराष्ट्राच्या मुख्यालयात विविध कामांच्या नावावर कोट्यावधी रूपयांचा दरोडा टाकण्याची हिंमत या दोन कार्यकारी अभियंत्यांनी दाखवली. गेल्या तिनही विधीमंडळ अधिवेशनात या मुद्यावर आ. चरणभाऊ वाघमारे यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातुन शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची वर वर चौकशी करून शासनाची दिशाभूल क रण्याचा प्रयत्न केला. साबां प्रशासनात या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांचे असलेले हितसंबंध सत्य दडपण्यास कारणीभूत ठरले होते.तथापी मुख्यमंत्र्यांनीच चौकशी प्रक्रियेत लक्ष घातल्याने मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आणि पांढरे तसेच मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी हे तिघे वेगवेगळ्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करीत असल्याने सर्वांनाच ताटाखालचे मांजर बनविणे या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांच्या कुवती बाहेर आहे. तरी देखील रणजीत हांडे यांनी दोन दिवसापुर्वी ग ृहखात्याकडे असलेल्या मंत्रालय प्रवेशद्वारावरील आवक जावक नोंदीत फेरफार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. तो असफल ठरल्याने येत्या काही दिवसात या दोन्ही कार्यकारी अ भियंत्यांवर असलेले दोषारोप सिद्ध होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
;शुज्ञ’
अशा आहेत आ. चरणभाऊ वाघमारेंनी केलेल्या तक्रारी आणि चौकशी अधिकारी
क्र. तक्रारीचे नाव चौकशी अधिकारी घोटाळा लाखात
1) उंदीर घोटाळा पांढरे, (मुंबई साबां दक्षता
पथक अधिक्षक अभियंता) रू 4,79100/-
2) मंत्रालय डेब्रीज घोटाळा अरविंद सूर्यवंशी, (मुंबई
साबां अधिक्षक अभियंता) 34 लाख
3) पेव्हर ब्लॉक धनंजय चामलवार
(मुंबई साबां दक्षता पथक
अधिक्षक अभियंता) 25 लाख
4) प्रधान सचिवांचे दालन क्र. 618 धनंजय चामलवार 72 लाख
5) मंत्रालय काँक्रीटीकरण घोटाळा धनंजय चामलवार 21 लाख
6) साईन बोर्ड घोटाळा धनंजय चामलवार 26,50,000
7) एकाच दिवशी 870 मजूर घोटाळा धनंजय चामलवार 24 लाख
या प्रत्येक घोटाळ्यावर उद्यापासून तपशीलवार वृत्तांत...
--------------------------------------