Breaking News

दुचाकीच्या डिक्कीतून ७९ हजार लांबविले

कोपरगाव : शहरातील गजबजलेल्या ठिकाणावरून सुझुकी अँक्सीस या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी सुमारे ७९ हजार रुपये लांबविले. मधुकर अण्णासाहेब नरोडे {रा. जानकी विश्व येवला रोड,} हे त्यांच्या स्वमालकीच्या शोरूममधून बँक ऑफ महाराष्ट्र येथे भरणा करण्यासाठी गेले होते. मात्र बँकेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने ते दुसऱ्या कामासाठी बस स्टँड समोरील ओरिएन्टल इन्शुरन्स ऑफिसमध्ये दुचाकी ऑफिसच्या खाली लावून धनादेश देण्यासाठी गेले. याच गोष्टीचा अज्ञात चोरत्यांनी फायदा घेऊन काही क्षणाच्या आत दुचाकीच्या डिक्कीत असलेले सुमारे ७९ हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. याबाबत मधुकर नरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.