दुहेरी हत्याकांड : गायकवाडला पोलीस कोठडी
जामखेड : दुहेरी हत्याकांडातील मूख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड याला न्यायालयाने दि. १० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दि. २८ एप्रिल रोजी शहरातील योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोघांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या खूनप्रकरणारील आरोपींंच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडून १० पथके रवाना करण्यात आली होती. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड यास पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथून अटक करण्यात आली. यावेळी पोलसांनी न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त तैनात करण्यात ठेवला होता.
