Breaking News

ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू


शिर्डी येथून काम आटोपून चांदेकसाऱ्याकडे जाणाऱ्या सागर सुभाष माळी {वय २० } याला सावळीविहीर शिवारात नगर-मनमाड रोडवरपाठी मागून येणाऱ्या ट्रकची { क्र. जी. जे. ०४ एक्स. ७४४१} जोराची धडक बसल्याने सागर माळी हा ठार झाला. 
या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला रावसाहेब हरिभाऊ माळी {वय ३०} हा जखमी झाला. दि. ३० एप्रिल रोजी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान सदरचा अपघात घडला. अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सामाजिक कार्यकर्ते अनिल गांगुर्डे आणि भाऊसाहेब जगताप यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. जखमी रावसाहेब माळीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.