पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांवर हल्ला
राहुरी तालुक्यातील सात्रळ परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ली प्रचंड धूमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रदिनी {दि. १} या कुत्र्याने तांभेरे रस्त्यालगत राजेंद्र यादवराव वाघचौरे यांच्यावर हल्ला केला. तसेच पांडुरंग शुक्लेश्वर बोरुडे हे जिमवरून घरी परतत असताना या कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यामुळे या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
या सर्वांची प्रकृती चितांजनक झाल्याने त्यांना लोणी येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी जखमा साफ करून त्यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल रूग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्या रक्त तपासण्या करून त्यांना रात्रीपर्यंत उपचार सुरु करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी सात्रळ-तांभेरे रोडवरील अनेक तरुणांनी जीवाची बाजी लावून या कुत्र्याला हुसकावून लावण्यासाठी पुढाकार घेतला.
यामध्ये जयेश वाघचौरे, निलेश औटी, राहुल वाघचौरे, अहमद इनामदार, संदिप वखरे, नवाज इनामदार, केशव वाघचौरे, प्रशांत वाघचौरे, अलतमाश इनामदार आदींचा समावेश आहे.