Breaking News

श्रीविवेकानंद नर्सिंग होम येथे २१ ते २५ पर्यंत महाशिबिर


राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असणाऱ्या श्रीविवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविदयालय व चिकित्सालय यांच्यावतीने सोमवारपासून {दि. २१ मे ते दि. २५ } सर्वरोग निदान व उपचार महाशिबिराचे श्रीविवेकानंद नर्सिंग होम, राहुरी फॅक्टरी येथे आयोजन करण्यात आले आहे,

अशी माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विलास कड यांनी दिली. संस्थेचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे.याप्रसंगी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे आदींसह सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.