Breaking News

मांचीहिल येथे २९ पासून व्यसनमुक्ती शिबिर


आश्वी : येथील आझाद हिंद प्रतिष्ठान, अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय व राजूरच्या गौधाम व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय निवासी व्यसनमुक्ती संस्कार व आयुर्वेद पंचकर्म उपचार शिबिराचे मंगळवारी {दि. २९ मे ते दि. ३ जून} या कालावधीत मांचीहिल येथे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारप्राप्त गौराम बिडवे हे तरुणांचे समुपदेशन करणार आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. शितल कुटे यांनी दिली आहे.