खर्डा येथे जिल्हा सहकारी बँकेत एटीमचा शुभारंभ
तालुक्यातील खर्डा येथे काल रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक खर्डा शाखेत एटीम मशीनचा शुभारंभ जनसेवा फौडेशनचे डॉ. सुजय विखे यांचे हस्ते करण्यात आला. या शाखेत खर्डा व परिसरातील दहा विविध कार्यकारी सोसायट्यांचा कारभार चालतो. सर्व पीक कर्ज, पीक विमा व शासकीय अनुदान या बँकेमार्फत केले जातात. शेतकरी वर्गाची विश्वसनीय बँक म्हणुन या शाखेकडे पाहिले जाते. या एटीममुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होऊन फायदा होणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, जामखेड तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, खर्डा येथील ज्येष्ठ नेते अॅड.नितीन गोलेकर, भाजपाचे माजी जि.प. सदस्य कांतीलाल खिवंसरा, टीडीओ दहीकर, शाखाधिकारी भिमराव अब्दुले, इन्सपेक्टर काशिद, खजिनदार नन्नवरे, लेखापाल इथापे, राजु पवार, सुरेश महाडीक, बाळासाहेब गोपाळघरे, वसंत सावंत आदी उपस्थित होते. या सुविधेमुळे खर्डा येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.