Breaking News

भारतीय लोकशाही जगाला मार्गदर्शक - सचिन साठे

पुणे, दि. 30, मे - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना संविधान सादर केले. तेव्हा खंडप्राय भारतात बहुभाषिक सर्वधर्मिय संस्कृतीचे मुलभूत स्वातंत्र्य हक्क सर्व नागरिकांना प्रदान करण्यात आले. तेव्हापासून स्थापन झालेली सर्वसमावेशक भारतीय लोकशाही जगाला मानवतावादासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे मत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोरवाडी पिंपरी येथील फैजाने निजामी मस्जिद, मध्ये सर्व धर्मिय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, काँग्रेस प्रदेश सदस्य संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदींसह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.