Breaking News

पुणे-निजामाबाद-पुणे पॅसेंजर 31 जूनपर्यंत रद्द

पुणे, दि. 31, मे - सोलापूर विभाग येणार्‍या वम्बोरी व राहुरी रेल्वे स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम 31 जूपपर्यंत सुरू राहणार असून यामुळे या मार्गावरून जाणारी पुणे-निजामाबाद-पुणे पॅसेंजर 31 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनच्या वतीने देण्यात आली. 

सध्या रेल्वे प्रशासनाकडून विविध ठिकाणी लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे यामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना पर्यायी मार्गाने प्रवास कराला लागत आहे. पर्यायी मार्ग हे महागडे व न परवडणारे असल्याने प्रवासी पॅसेंजरने प्रवास करणे पसंत करतात. मात्र, काही काळ त्यांना पर्यायी मार्गानेच प्रवास करावा लागणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.