Breaking News

केडगाव दुहेरी हत्याकांड - भानुदास कोतकरला अटक

अहमदनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडात फरार असलेल्या भानुदास कोतकरला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी आलेले असताना पोलिसांनी त्याला पकडले. लांडे खून प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेत कोतकरला जामीन मिळाला असून हजेरीसाठी तो आज सकाळी येरवडा पोलिस ठाण्यात आला होता. तेथे पोलिसांनी केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात ताब्यात घेतले आहे.