Breaking News

महिला पोलिस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न


जामखेड : जामखेड येथील पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनाली जाधव यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचेवर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जामखेड पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल सोनाली जाधव यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण समजले नाही. कशामुळे या शेवटच्या टोकाचा निर्णय महिला पोलिस कर्मचारी जाधव हिने घेतला? याबाबत संपूर्ण जिल्हयातील पोलिस कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे