‘रयत’च्या शताब्दी वर्षात इन्व्हेशन-इनोवेशनसह इंक्युबेशन केंद्रांची स्थापना करणार : खा. शरद पवार
सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) : भविष्याचा वेध आणि काळाची गरज लक्षात घेऊन कृषीतंत्रज्ञान, संशोधन, कुशल मनुष्यबळ निर्मिती, उद्योग इत्यादी क्षेत्रासाठी रयत शिक्षण संस्था ही पथदर्शक काम करेल. यासाठी नाविन्यपुर्ण संशोधन, सर्जनशीलता आणि कल्पना विकसन या तीन क्षेत्रात संस्था शताब्दी वर्षापासून अधिक जोमाने कार्य करणार आहे. त्यानिमित्त टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर व सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) यांच्या माध्यमातून सातारा, खारघर (मुंबई), हडपसर (पुणे) व अहमदनगर जिल्ह्यात इन्व्हेशन-इनोवेशनसह इंक्युबेशन केंद्रे स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी अध्यक्षिय भाषणात सातारा येथे केली.
येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 59 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एन. डी. पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, शंकरराव कोल्हे, आ. गणपतराव देशमुख, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील, खा. रामशेठ ठाकूर, खा. सुप्रियाताई सुळे, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मोहनराव कदम, आ. सुमनताई पाटील, आ. प्रशांत ठाकूर, बबनराव पाचपुते, विश्वजित कदम, प्रभाक र देशमुख, चंद्रकांत दळवी, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, वैभव नायकवडी, एसटीपीचे राजेद्र जगदाळे, संजीव पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, अॅड. भगिरथ शिंदे यांच्यासह संस्थेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा गावातील रहिवाशी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संशोधक डॉ. चारुदत्त मायी यांना तर रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्काराने गुजरात राज्यातील रहिवाशी असलेल्या केंद्रीय दुग्धविकास बोर्डाच्या अध्यक्षा डॉ अमृता पटेल यांना प्रदान क रण्यात आला. 2 लाख 50 हजार रुपय रोख सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणार्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन खा. शरद पवार म्हणाले, आजच्या समाजाची गरज लक्षात घेऊन उत्कृष्ठ दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी रयत शिक्षण संस्था, टाटा टेक्नॉलॉजी आणि एसटीपी यांच्या सहयोगातून इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेशन या केंद्रांची उभारणी करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी असून त्यांचे भारतातील सहकारी एसटीपी हे आहेत. या दोन भागीदारांच्या सहकार्यातून खारघर (मुंबई), हडपसर (पुणे) सातारा या ठिक ाणी केंद्रांची उभारणी केली जाणार असून भविष्यात अहमदनगर येथे ही चौथ्या केंद्राची निर्मिती केली जाईल. या माध्यमातून नवीन उद्योजकांना प्रशिक्षण देणे उच्च दर्जाचे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे. नवनिर्मिती करणार्या उद्योजकांना मेंटॉरशिप देणे या उद्देशाने प्रेरित होऊन एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. टाटा टेक्नॉलॉजी ही संस्था जगातील 123 सहकारी कंपन्याना बरोबर घेऊन युरोप, उत्तर अमेरिका, मध्य व पूर्व अशियामध्ये कार्यरत असून भविष्यात या माध्यमातून रयत शिक्षण संस्था उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर समाधीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी केले. संस्थेच्या प्रगतीचा आढावा संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी घेतला. मानपत्राचे वाचन डॉ. शिवलिंग मेनकुदळे व डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी केले. यावेळी थोर देणगीदार, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, नॅक ए व ए प्लस मानांकन प्राप्त शाखा, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेचे सहस चिव डॉ. विजयसिंह सावंत यांनी मानले.