Breaking News

समाधिस्थ संतांचा अपमान करणार्‍या अपप्रवृत्तीवर अब्रुनुकसानीचा दावा करणार : विष्णू महाराज


त्र्यंबकेश्‍वर : निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे नीतिनियम पाळून त्यांची परंपरा जोपासण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत समाधिस्थ झालेल्या संतांचा अपमान करून समाजाची दिशाभूल करणार्‍या अपप्रवृत्तीचा जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करत बातम्या छापून आणत जय बाबाजी भक्त परिवाराची बदनामी करणार्‍या व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी के. बी. भामरे, भक्त परिवार तालुका अध्यक्ष सोमनाथ महाले, परशुराम पवार, बंडू खोडे, वाळू मोरे, परमेश्‍वरानंदगिरीजी महाराज, रामप्रसादगिरीजी महाराज आदी उपस्थित होते.
यावेळी प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले की, निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज यांची परंपरा अविरतपणे चालू राहण्यासाठी विविध साधू अविरतपणे काम करत आहेत. याच परंपरेतील संत गेल्या आठ वर्षात त्र्यंबकेश्‍वरमध्ये फक्त दोन साधूंना समाधिस्त झालेले असताना मागील महिन्यात दोन साधुंना सोबत आश्रमात पुरले असल्याच्या काल्पनिक गोष्टी वर्तमानपत्रात छापून आणत अशा संतांच्या समाधीबद्दल अपशब्द काढणार्‍या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच 2011 साली जनार्दन स्वामी यांच्या हातुन संन्यास घेतलेल्या संतश्री आनंदगीरी महाराज यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्व आखाड्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये परवानगी घेऊन समाधी देण्यात आली आहे. आनंदगिरी यांच्या समाधी घेऊन सहा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. तसेच स्वामी वासुदेवगिरीजी महाराज यांना त्यांच्या इच्छेनुसार ऑक्टोबर 2017 रोजी समाधी देण्यात आली असून त्यांचा कार्यक्रम नोव्हेंबरमध्ये आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस परवानगी घेऊन क रण्यात आला आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून समाधी दिली असतांना एवढ्या दिवसानंतर खोट्या बातम्या प्रसिद्ध करणार्‍यांचा हेतू काय हा अनाकलनीय प्रश्‍न असल्याचे विष्णू महाराज यांनी सांगितले.
डॉ. दिलीप जोशी व अनिल काळे हे या आश्रयामाचे विश्‍वस्त नसून त्यांच्याकडे याबाबत काही कागदपत्रे असल्यास त्यांनी दाखविण्याचे आवाहन यावेळी प्रशासकीय अधिकारी भामरे यांनी करत त्र्यंबकेश्‍वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात मिळालेल्या जमिनी या कायदेशीर मिळाल्या असून येथे कोणतेही गायरान जमिन आश्रमाच्या ताब्यात नाही किंवा क ोणत्याही ग्रामस्थांनी गायरान जमीन परत मागितली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसात चुकीची माहिती छापुन येत आहे. त्याने संत जनार्दन स्वामी परंपरेची बदनामी होत असल्याने सर्व भक्त परिवार नाराज असून. यापुढे भक्त परिवाराची बदमामी करणार्‍या वर कायदेशीर कारवाई करण्याची माहिती उपस्थित भक्त परिवाराच्या सदस्यांनी दिली. यावेळी महिला समिती अध्यक्ष सुमन पैठणकर, रमेश झोबन, अमर आढाव, दीपक जमदाडे, दीपक मेदड्डे, सुमन देशमुख आदी उपस्थित होते.