व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उदावंत
कोपरगाव : शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चरिटेबल ट्रस्ट संचलित साईबाबा तपोभुमी मंदिर व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच करण्यात आले. या समितीच्या अध्यक्षपदी निलेश उदावंत यांची निवड करण्यात आली.
समितीच्या उपाध्यक्षपदी सचिन गवारे, सचिवपदी मुकुंद भूतडा यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी अंबादास वडागळे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, संतोष वढणे यांची निवड करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सचिव निवृती शिंदे, ज्येष्ठ विश्वस्त छबुराव आव्हाड, विजय आढाव, मनोहर कृष्णाणी आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
