Breaking News

येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस; शेतकर्‍यांची धांदल


येवला, दि. 14, मे - राजापुर (ता. येवला) येथे सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह गाराचा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतात शेतकर्‍यांचे कांदे व इतर धान्य भिजले या पावसामुळे थोड्या फार प्रमाणात उष्णता कमी झाली तरी शेतकर्‍यांचा कांदा शेतात पडून होता त्यामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांचे अतोनात हाल झाले.

15 ते 20 मिनटे जोराचा पाऊस झाला. त्यात गाराही पडल्या. विजेचा कड़कडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.कुसुमाडी येथेही वादळी वार्‍यासह जोरदार स्वरूपाचा पाउस पडला. कुसुर येथे तर शेतात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचा तोंडाचा घास हिरावला गेल्याचे दिसून येत आहे.