Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांना निरोप


प्रवरानगर : लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी नुकत्याच एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ, डॉ. नचिकेत दिघे, डॉ. संजय भवर, प्रा. प्रसाद विखे आदींसह महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पुढील उच्चशिक्षण, नोकरी, किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुश लांडगे, धीरज शिरुर, निनाद पदळकर, सुहास तोडडमल, आकाश पवार, शेख जब्बार, शिवप्रसाद खोसेव, श्वाघमोल, प्रतिक कार्वेन्ज, समाधान मस्के, गौरव चिंचोर हनुमंत घुले आदी विद्यार्थ्यांनी अनुभव विशद केले.