Breaking News

हभप पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील हभप सुनिल महाराज पवार यांनी केलेल्या अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातीळ उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना टाकळीभान येथील ज्ञानोदय बहुद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी लिज्ज्त पापड कंपनीचे सुरेश कोते, आ. भाऊसाहेब कांबळे, आश्वी खुर्दचे सरपंच म्हाळू गायकवाड, पोलिस पाटील बापूसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. आदि मान्यंवराच्या हस्तेंं व ज्ञानोदय बहुद्देशीय संस्था टाकळीभान यांच्याकडून राज्यस्तंरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

हभप पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात किर्तणातून संताचे आचार व विचार पोहचविण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. कर्मकांड व अंधश्रध्दा यावर परखड मत मांडणाऱ्या काही मोजक्या कीर्तनकारांमध्ये त्यांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये अध्यात्म व कीर्तनाची गोडी निर्माण करण्याची त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची टाकळीभान येथील ज्ञानोदय बहुद्देशीय संस्थेने दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले. दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल व्ही. डी. वर्पे, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब भोसले, बाळासाहेब मांढरे, अनिल गायकवाड, रमेश गिते, मकरंद गुणे, रामराव सोनवणे, संतोष भडकवाड, दगडू गायकवाड आदींसह आश्वी खुर्द येथील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून हभप पवार यांचे अभिनंदन होत आहे.