सेनेच्या गोर्डे यांना यथोचित मान : खा. दानवे
पैठण / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देण्यात येतो. त्यामुळे भाजपात प्रवेश घेतलेल्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या सारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यास निश्चितच मान- सन्मान मिळेल, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. अधिकमास महिन्याचे निमित्त साधून आज पैठण येथील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे पैठणमधे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे.
भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शरद कारखान्याचे संचालक सुरेश दुबाले, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, शिवसेनेचे माजी नगरसेवक सतिश पल्लोड, आदींचा समावेश आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आ. नारायण कुचे, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव औटे, महिला प्रदेशाध्यक्ष रेखा कुलकर्णी, माजी आ. भाऊ थोरात, डॉ. सुनील शिंंदे, शेखर पाटील, विधिज्ञ बद्रीनारायण भुमरे, कांतराव औटे, प्रल्हाद औटे, नगरसेवक आबासाहेब बरकसे, महेश जोशी आदी उपस्थित होते.