Breaking News

दहशत गाजविणारी माळी गॅंग अखेर हद्दपार


राहुरी :तालुक्यातील बारागाव नांदूर येथील वाळू माफिया आणि पोलिसांच्या रडारवर असलेले अट्टल गुन्हेगार सुभाष, गौतम आणि किशोर माळी या तिघा बंधूंना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. त्यामुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. 
संघटित टोळीच्या माध्यमातून मुळा व प्रवरा नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या घातक शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करणे, अपहरण, दहशत निर्माण करणे आदी अनेक प्रकारचे आरोप बारागाव नांदूर येथील माळी टोळीविरुद्ध आहेत. संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करणा-या सुभाष साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी {सर्व रा. बारागाव नांदुर} या तीन बंधूंविरूध्द राहुरी पोलीसात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांच्या टोळीचा हद्दपारीचा प्रस्ताव प्रांतधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या हद्दपार प्रस्तावावर अंतिम कारवाई करत टोळी प्रमुख सुभाष माळी व त्याच्या दोन सख्या भावांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी महाराष्ट्रदिनी {दि.१} जारी केले. 

मुळा नदीपात्रातील वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा, अपहरण, घातक शस्रासह गंभीर दुखापत, अग्निशस्राचा धाक दाखवून मारहाण करणे, दरोडा, जबरी चोरी, शासकीय कर्मचा-यांना मारहाणसह आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे माळी टोळीवर दाखल आहेत.