Breaking News

श्रीरामपुर शहर परिसरात पावसाची हजेरी


उक्कलगाव - गेल्या दोन ते तीन दिवसापासुन उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याने उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. आज जिल्हयात तापमान 42 अंश सेल्सीयस एवढे तापमान गेले होते. काल शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. 

दरम्यान अचानक श्रीरामपूर व शहरात आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती. सुमारे अर्धा तास पाऊस चालु होता. पाऊस आल्याने गारवा निर्माण झाला आहे. रस्त्यावर इकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. पाऊस झाल्यान हवेत गारवा निर्माण झाल्याने श्रीरामपूरकर सुखावले आहेत. दरम्यान बेलापुर, उक्कलगाव, एकलहरे परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते.