Breaking News

अखेर एकलहरे येथील गावतळे पुर्ण क्षमतेने भरले


उक्कलगाव - श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या सतर्कतेमुळे ग्रामपंचायतीच्या जवाहरवाडी येथील गावतळे पूर्ण क्षमतेने भरल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भंडारदारा धरणावरील कालव्यातून पाणीपुरवठा होत असलेल्या चारीतून पिण्यासाठी पाणी सोडले जात असे . मात्र या वर्षी भर उन्हाळ्यात व तेही ऐन मे महिन्यात पाठबंधारे विभागाच्या कालवा निरीक्षांनी शेतीसाठी आवर्तने आहेत , त्यामुळे गावतळ्यात पाणी सोडता येणार नाही. असे एकलहरे ग्रामस्थांना स्पष्ट केले होते. 

हे वृत्त कळताच एकलहरेच्या सरपंच  लक्ष्मी उमाप, उपसरपंच नसिमखातून जहागिरदार, पंचायत समितीचे माजी सदस्य इसाक जहागिरदार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष लालमोहमद जहागिरदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिराज आलम शेख, प्रगतशील शेतकरी दिपक शितोळे, आण्णासाहेब वाडकर, इमाम जहागिरदार, यांच्यासह ग्रामस्थांनी पाठबंधारे विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता आहिलाजी खैरे, शाखा अभियंता निकम, अडसरे, वाघ यांची भेट घेऊन पाणी टंचाई बाबत सविस्तर माहिती दिली. या गाव तळ्यालगत पाणीपुरवठा करणारी विहीर तसेच हातपंप या खेरीज शेकडो हेक्टर शेतकर्‍यांची शेतजमीन आहे. लगतच गावतळे असून या गावतळ्यात पाणी सोडल्यास पुढे पावसाळा सूर होईपर्यंत अडचण भासणार नाही, ऐन भर उन्हाळ्यात पिके करपलेली अवस्थेत दिसून येत आहे, तसेच विहीर व बोअरवेलने पाण्याचा शेवटचा टप्पा गाठला आहे. जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही सर्व हकीकत पाठबंधारे खात्याचे अधिकार्‍यांसमोर मांडले असता अधिकार्‍यांनी मान्य केली, व लगेचच चारी नंबर 7 वरून पूर्ण क्षमतेने जवाहरवाडी येथील गावतळे भरून दिले. हे गाव तळे पूर्ण क्षमतेने भरताच हे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली . गाव तळ्यात पाणीच साठवण होताच चोवीस तासाच्या आत एक किलोमीटर अंतरावर विहीरी व बोअरवेल यांना पाण्याची पातळी झपाट्याने वाढलेले दिसून आले. एकलहरे ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्या नंतर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नांकडे अधिक लक्ष घातल्याने जनतेने पंचायत पदाधिकार्‍यांना धन्यवाद दिले आहे. दरम्यान पाठबंधारे खात्याकडून मिळालेले हे पाणी कायदेशीर पाणीपट्टी भरण्यास ग्रामपंचायचे ग्रामविकास अधिकारी रमेश निभे यांनी लेखी पत्राद्वारे मान्य केल्याने त्यामुळे पाठबंधारे खात्याने छातीठोकपणे पाणी दिले. या कामी कालवा निरीक्षक अडसरे, वाघ हजर होते. 

याकामी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत सर्व पाणी गावतळ्यात पोहचविण्यासाठी प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब वाडकर, नानासाहेब वाडकर, ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मी उमाप, उपसरपंच नसिमखातून जहागिरदार, ग्रामपंचायत सदस्य रवी भालेराव, सुरेश बर्डे, बेबी रावण निकम, दीपक शितोळे, गणेश उमाप, समीना मुश्ताक शेख, सतीश सोनवणे, बाबा भालेराव, सतीश दाभाडे, संतोष पांढरे, नाना पाटील, फिरोज पठाण, अमोल त्रिभुवन, दीपक अपील, म्हसुकाका सुरडकर, पाराजी वडितके, सादिक अमीर, मलिक गफ्फार, संदीप हेलिंगे, श्रीधर सोनवणे, आरिप शेख, मुश्ताक पिंजारी, सुबहान शेख, अल्ताफ शेख, शकील शेख, सादिक पठाण, अरविंद हिवराडे, सतीश दाभाडे, प्रवीण मिसाळ, गणेश अंभोरे, सलमान पठाण, इम्रान सय्यद, रय्यान शेख, सुरेश वाडकर, जंगलू मोरे, संदीप हेलिंगे, शाहरुख पठाण, अफसर पठाण, सिद्धीक पांडे, किसन गढवे, रामदास पारखे, सीताराम, प्रकाश सोनवणे, सचिन विधाटे, बापू विधाटे, सलीम शेख, मुन्ना पांडे संतोष पोपळघट, ज्ञानेश्‍वर सोनवणेसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.